The Immortal Love

The Revolution of the Immortal Love in the Kaliyuga

The eternal journey of Bhikshsuk in the Mahanubhav Dharma till the end of the this Kaliyuga!

← Back to Home
Message of the Immortal Love

Pitru Dosh Nashak Sarvadnya Shri Chakradhar Stotra

By The Messenger of the Immortal Love10 January 2024

पितृदोष नाशक श्रीचक्रधर स्तोत्र श्री चक्रधराय नम: श्री पंचावताराय नम: श्री खणेपुरी तीर्थ स्थानाय नम : ——————– नमो निराकार निर्गुणा । नमो अनंता शक्ती सगुणा । नमो मायापुर धारणा । कृपा करावी जग जीवना ।।१।। दया मया कृपा करुणा । सकळ सिध्दी तुझ्या चरना । जीवांचे दुःख तुज पहावेना । कृपा करी दयाघना ।।२ // अनंत ब्रम्हांड नायीकेचा नायक तु । अनंत गुणधर्म शक्तीयुक्त तु । भरवसनगरी व्यक्तलास तु । श्रीचक्रधर नाम अंगीकरुनी ।।३।। दुःखी जीवांचा करावया उध्दार । खणेपुरी आलासी धावुन । लीळा चमत्कार दाखवुन । जना वेधीले दयाघना ।।४ ।। कार्तिक शुध्द तृतियेला । खणेपुरी घडली अद्भूत लीळा । दुःखी जीवा उध्दरावया । आला कैवल्यरायो ।।५।। जय जयाजी श्रीचक्रधरा । तुमची चांपेगौर श्रीमुर्ती । दर्शनमात्रे जनासी वेधीती । वार्ता गेली ग्रामाला ।।६।। खणेपुरीच्या शिवारात । काटियेतळी एकांतात । लखुदेवबासी सांगतो मात । ऐकोनी अवधे झाले चकित ।।७।। ग्रामस्थ लागती चरणाला । भारध्वज पक्षी तोही वेधला । वार्ता गेली चहू दिशाला । लोक धावती दर्शनाला ।।८।। मर्दना मादणे स्नान घालीती । चंदणाची उटी लाविती । पुष्प माळा गळा घालीती । ओवाळीती पंचदीप ।।९।। बाईसा म्हणती बाबा । स्वीकारावीजी आरोगणा । म्हणती नाथोबाशी भीक्षा आणा । दहिभात आरोगिले ।।१०।। ऐशी घडली अद्भूत लीळा । भक्तीजन लागती चरणाला । देव खणेपुरीसी प्रगटला। दुःख निवारण करण्याला ।।११।। जनाचे पाहुनी दुःख दैन्य । कळवळलाशी तू दयाघन । दोष उदरी सामावून । जीव उध्दरण्याशी प्रर्वतला ।।१२।। हा अवघा जनु ठकलेला । तू आलाशी फेडण्याला । मी दुःखाने गांजलेला । माय बापा चक्रधरा ।।१३।। मी पामर दुःखिस्त । हीन दीन अधम पतित । पितृ दोषाने झालो त्रस्त । माय बापा चक्रधरा ।।१४।। संसार दुःखाचे रडगाणे । गाऊनी मागतो तुज मागने । तू माय बाप दयाळू पणे । देशील ते घेईल संतोषाने ।।१५।। काय सांगू माझी व्यथा । देवा तू सर्व असे जाणता । रंजल्या गांजल्यांची तू माता । तू माहेर जीवांचे ।।१६।। देवा माझे दुःख अमित । दारिद्र्याने झालो पिडीत । परिवाराची झाली वाताहत । पितृ दोषे भंगलो ।।१७।। घर नाही राहावेया । अन्न नाही खावया । वस्त्र नाही नेसावया । तू जननी पाहे मज ।।१८।। माझ्या दुःखाला मीच कारण । तुज बोल काय विनाकारण पुर्वजन्मीचे माझेच कर्म हीन म्हणून दुःखाते पावलो ।।१९।। चक्रधरा तू माय माऊली । देई मला कृपा सावली । शांत करी अंतरीची काहिली । चरणी देई आसरा ।।२०।। तुझी किर्ती ऐकूनी । कानसेचा ब्राम्हण आला धावूनी । पुत्र आयुष्य धन देऊनी । त्याला जीवनी सुखी केले ।।२१।। तैसे मज सुखी करावे । माझे दैन्य दुःख फेडावे । माझेया परिवाराशी रक्षावे । कृष्णनाथा चक्रधरा ।।२२।। सकळांचा तू गोसावी चक्रधारी । खणेपुरीशी राज्य करी । तुझे भारध्वजा वेध स्थान । सर्व सुखाचे निधान ।।२३।। जे खणेपुरीसी जाती दर्शना । त्यांचे पाप होई भंजणा । ते सुखी होती जीवना । सर्वही दोष नासती ।।२४।। आणि काळसर्प अति दारुण । ग्रासावया करी आक्रमण । त्याचेही करी निवारण । भारध्वजा वेधू स्थान ।।२५।। मनी धरुनी भक्ती भाव । विडाअवसर करी समर्पण । त्यांचे विघ्न होई निवारण । अतृप्त होई शांत ।। २६ ।। माझा पितृ दोष नासावेजी । मला यश सिध्दी द्यावेजी । कु-विद्ये पासौनी मज रक्षावेजी । भारध्वजा वेधका ।। २७।। जो पंचरुप आनी आपुल्या ध्यानी । लीळा आठवी एकाग्र होऊनी सकळ मनोरथ पुरवी चक्रपाणी । रक्षिता समर्थ ।। २८ ।। अष्टोदशे विडे अर्पण करुन । श्रीचक्रधर स्तोत्र करी पठण । तयाचा पितृदोष नासून तो सुखी होय ।। २९।। त्याच्या परिवाराची फिटेल भ्रांत। यश मिळेल त्याला निश्चींत । दारीद्रय फिटून तो श्रीमंत । होईल जाणा ।।३०।। म्हणौनी नित्यदिनी करावे पठण। मग करावे अन्नोदक सेवन । श्रध्दाभाव मनी धरुन । भजावे पंचकृष्णाते ।।३१।। गुरुशी आनुन आपुल्या घरी । त्याशी भजावे तन मन धनानी । त्याची प्रसन्नता लाभलेया । पावे चक्रपाणी ।।३२।। इती श्री पितृदोष नाशक श्री चक्रधर स्तोत्र । रचयीता प्रज्ञासागर महानुभावीय महंत । विश्वशांती नामस्मरण आत्मतीर्थ गंगातीर । श्री खणेपुरीचे महास्थान की जय ।